इस्रायल आणि अमेरिका या रक्तरंजित संघर्षाची दुसरी बाजू लवकर समजून घेतील आणि त्याप्रमाणे कृती करतील, अशी अपेक्षा करूया...
या संकटाच्या केंद्रस्थानी काय आहे? हा हमासचा दहशतवाद आहे की, त्याहीपेक्षा आणखी काहीतरी आहे? अनेक इस्रायली विचारवंत, राजकीय शास्त्रज्ञ आणि इतिहासकार – उदा. युव्हाल नोआ हरारी, डॉ. गॅबर मेट, इलन पप्पे, अवि श्लेम आणि अमेरिकन विद्वान नॉर्मन जी. फिंकेलस्टीन - यांनी अनेक मुलाखतीत सांगितलं आहे की, इस्रायलच्या निर्मितीप्रक्रियेमध्ये पूर्वीपासून पॅलेस्टाइनमध्ये राहणाऱ्या अरबांना न्याय मिळालेला नाही.......